Wednesday, June 25, 2008

जसे विचार कराल तसे व्हाल!

आपण मनात जो विचार करतो तसे आपण होतो. जर कुणी म्हटले आज आपला चेहरा खुप आजारल्या प्रमाणे ,मलूल असा दिसत आहे.आपण लगेचच कुणी रिमार्क केलेल्या भावनांना सारख मनात घोळवत बसतो.खर तर कुणी दिलेल्या काँम्प्लिमेंटने आपण किती सुखावतो,भारावून जातो म्हणजे मनाला आपण फ़क्त yes...no...याच भावनांच्या सीमेत सीमित करत जातो...!याचा अर्थ असा नव्हे की आपण कुणाच्याही भावनांची कदर करायलाच नको..फ़क्त बस्स ईतकेच की आपण वरील दोन भावनांना योग्य रीतीने जाणुन घ्यावे. प्रत्येक भावानांचा अँनेलीसिस करुन जीवन ठरावीकतेने जगत बसू नका शक्यतो सकारात्मक positive thinking विचांराना मनात ठेवा.आपण आरशा जवळ जाऊन स्वतःला विचारा आपण कसे दिसतो ? केवळ कुणी सांगितलेल्या गोंष्टीनाच जीवना स्थान व प्राधान्य न देता आपण स्वतःला विचारुन काही गोष्टी ठरवा .समोरचा प्रत्येक वेळी बरोबर असेल हे सांगणे कठीण आहे.मनाने आपण एखाद्या गोष्टींचा अभ्यास केला तर काय होते ते पहा .यात योग्य भावनांच अविष्करण किती सुरेख आहे.प्रसंग तसा साधाच आहे .हे ऊदाहरण पहा- एका माणसाला दोन मुल होती.बाप व्यसनी होता..अट्टल दारुड्या होता...मुल मोठ्ठी झाली ...त्यातला एक खुप शिकला...तर एक उनाड निघाला...लोकांना हे जेव्हा कळले तेव्हा ते त्या उनाड मुलाला समजवायला गेलेत...तो उनाड मुलाला काहीतरी चांगल सांगण्याचा हेतू होता पण तो उनाड मुलगा म्हटला माझ्या वडीलांना तर दारुच व्यसन आहे घरात ते आईला मारझोड करायचे, दारु पिउन मलाही मारायचे ,मला हे पाहुन खुप वाईट वाटले.मग मी सुध्दा त्याचे अनुकरण करुन दारु पिऊ लागलो .माझ्या या व्यसनाला आणि कर्ज बाजारी पणाला सर्वस्वी माझे पिताच जबाबदार आहेत.
झाल...आता तेच लोक सरळ अट्टल दारुड्याच्या दुस-या मुलाकडे गेले पण हा साधा भोळा होता..हा तर व्यसनीही नव्हता..लोकांनी याला विचारले की तु घरात असे वातावरण असतांना एवढा मोठ्ठा अधिकारी कसा झाला तर तो म्हणाला माझे बाबा दारु पिउन मलाही मारायचे मी घाबरुन ठरवल की खुप अभ्यास करुन मोठ्ठ व्हायच...!
दोन मुलांनी आपल्या पित्याच्या मारण्याचा दॄष्टिकोन कसा जवळ ठेवला याचे ऊत्तर त्यांच्या विचारत दिसुन आले.जसा दॄष्टिकोन ठेवाल तसा मनुष्य त्या विचारांनी घडत जातो .

No comments: