बरीच माणस भेटतात रस्त्या वर तेव्हा ती अनोळखी असल्यास किंवा परिचीत व्यक्ति भेटली तर आपण त्याला कसा प्रतिसाद देतो?मी ब-याच लोकांना हा प्रश्न विचारला तेव्हा काही जण म्हटले अपरिचीत व्यक्ति भेटल्यास समोरच्या त्या अनोळखी कडे पाहुन वाटल की याची हेअर स्टाईल कशी आहे? गालात खुदकन हसु फ़ुटले...खर तर त्या माणसाकडे पाहुन मी आणखीन विचार करु लागलो ....खर तर त्या माणसाने माझ्या कडे मोठ्या आश्चर्याने पाहीले ...त्यालाही गालात खुदकन हसु फ़ुटले...मग मी विचार केला की हा का आपल्याला असा हसला...मनात नाना शंकानी त्या व्यक्तिला घेरले...अगदी जवळून जांताना त्या आसामीला पाहुन ती त्या समोरच्या व्यक्तिवर जाम भडकली...न बोलताही डोळे वटारले गेलेवरील दॄश्य आणि संवाद पाहील्यास असे दिसुन येते की या मानसिक संवादात काहीतरी
विसंवाद घडत गेला ?व्यक्ति तितक्या प्रकृति असतात...ना !आता ह्याच व्यक्तिची दुसरी घटना ....समोर परिचीत व्यक्ति भॆटली...त्यावर सुहास्य वदनाने तो हसला...अन हाय हँलो अस बोलला...थोडाफ़ार संवाद घड्लाही पण अपरिचीत व्यक्ति आणि परिचीत व्यक्ति भॆटली तेव्हा आपण दिलेला रीस्पाँन्स हा केवळ मानसिक शक्तिचा प्रत्यय होता ..कारण त्या अपरिचीत व्यक्तिला पाहुन आपण आपल्या मनात काहीतरी वेगळे थिंकींग करु लागतो वास्तविक त्या व्यक्तिने जर व्यकिमत्व विचासाचा अभ्यास केल्यास हेच दिसुन येते की आपण मनातुन समोरच्याचे जे चित्र रेखाटतो तसेच आपण त्या अँगलेने न्याहाळत असतो...थोडक्या समोरचा अनोळखी कोण आहे ...हे मनातुन का जाणायचा प्रयत्न करतो...आपण जेव्हा कुणाचा विचार करतो तेव्हा सर्व विचारांना मनात का घोळवतो..?वास्तविकआपल्याला फ़ार काही तरी जाणून घ्यायची ईच्छा तरी का असावी...??याच जागी त्या व्यक्तिने तुम्ही कोण असे म्हटल्यास तोही ऊलटपक्षी त्याला विचारतो अगोदर तुम्ही सांगा ?निरर्थक गोष्टींना फ़ार महत्व देउ नये. प्लेन माईंडेड रहा ...आपले मन हे फ़ार महान शक्तिने भरलेले आहे ...जिथे गरज असेल तिथेच विचार करावा...अन्यथा मनालाही बजवा ...की बाबारे ...थिंक सिंपल बट मोर...म्हणुन मनाला एखाद्या जंजाळात अडकवुन घेऊ नका..मानसिक शक्तिचा विकास हा केवळ माणसाच्या दोन डोळ्यांमध्ये तसेच दोन कानां मध्येच नसुन तो खरतर अंतरंगात आहे..म्हणुन मनाला ठरावीक दिशेचे थिंकिग करण्याची सवय जडवल्यासमन ही अर्तंमनाचे ऎकून घेईल.याचा फ़ायदा हाच की तुमच्या व्यक्तित्वात नम्रता येईल शिवाय परीपुर्ण विचार करतांना आपले डिसिजन चुकणार नाही ..कारण म्हणजे तुमचे मन फ़क्त ठराविक चांगल्या गोष्टींवर आपोआप केन्द्रींभुत होईल ..याने आपल्या व्यक्तित्वात दुभंगले पणा(split personality) जाणवणार नाही..वरील गोष्ट फ़ार क्षुल्लक आहे पण आपण परिक्षण केल्यास क्षुल्लक गोष्टीचें माहेर घर हे मनातच दडुन बसलेले असते ...मनातल्या शंका , विचांरांचा फ़ापटपसारा आपण मनात ऊगाचच का साठवुन ठेवावा? हे लक्षात येईल... काही लोक म्हणतात आम्ही अमूक गोष्ट आयूष्यभर विसरणार नाहीत? ते यामुळेच की काय ? आम्ही सर्व मनाच्या कप्यात सर्व ठेऊन आणखीण या उपर काय टाकता येईल हाच विचार करतो. म्हणुनच विचार करा साधा..सोपा..सरळ...!मनातले काही विचार आपल्याला बाजुला ठेवता येतात त्यासाठी ध्यान या योगीक क्रिया शिकुन घ्यावी लागेल.ध्यान कसे करावे? त्याचे फ़ायदे काय ..?हे सर्व आपण पुढे पाहुच...तो पर्यंत Think simple but more.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment