Friday, June 27, 2008

कर्तव्यदक्ष गॄहिणींसाठी सल्ला


  • शक्यतो पालेभाज्या ह्या दोन तीन पाण्यातुन स्वच्छ धुवून घ्याव्यात त्यामुळे किटक नाशकांचा नाश करण्यासाठी मारलेल्या फ़वा-यांचा अंश नाहीसा होतो.

  • फ़ुलकोबी चिरुन तिला बाहेर काही वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा त्यामुळे फ़ुलकोबीत लपलेल्या अळ्या पटकन-
    बाहेर पडतात.

  • शेतातल्या पालेभाज्या तोडतांना काही वेळा त्या सोबत वाढलेले काँग्रेंस गवतही बेमालुन काहीवेळा मंडईत पालेभाजी सोबत येते किंवा इतर विषारी गवत तोडले जाते हे हिरवे असल्याने नकळत राहुन ते जर जेवणात मिक्स झाले तर वांत्या,अपचन,पोट खराब होणे ,जुलाब हे लक्षण दिसुन येतात म्हणून काळजीपुर्वक पालेभाज्या निवडुन साफ़ कराव्यात.

  • दही शक्यतो ताजेच खावे.तसेच त्यात साखर घालून खावे.शिळ्या दह्याचा ऊपयोग विरजण म्हणुन करु नये.ताजे .फ़्रेश विरजण वापरावे

  • दही पटकन विरजावे म्हणुन त्याला बंद कुकर मध्ये ठेवावे पण कुकर खाली (गँसला आच ) लावू नये.थंड कुकर मध्ये दही लवकर जमते अगदी १५-ते २० मिनिटांत..!

  • वाचत रहा ...कळवा आम्हाला आपल्या tips & tricks ....कुठल्याही महत्वाच्या ...!
  • वरील टीप्स लेखकाच्या परवानगी शिवाय छापू नयेत.
  • No comments: